नाशिकच्या ग्रामीण भागात पावसाने पाठ फिरवली शेतकरी चिंतेत, शेतकऱ्याने काय केलं पहा | Nashik News
#Nashik #NashikNews #NashikRain #RainUpdate #Rainfall #MaharashtraRain #MaharashtraNews #Farmers #FarmerNews #FarmersProblem #Sheti #Agriculture #DroughtLikeSituation #Monsoon #RainShortage #RuralMaharashtra #Kisan #BreakingNews #LatestNews #lokmat
आभाळाकडे डोळे शेतात उभी पिकं आणि पावसाचा मात्र पत्ता नाही येवला तालुक्यात गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे पावसाअभावी शेतातील पिकांना ताण बसू लागला असून, पिकं वाचवण्यासाठी आता शेतकऱ्यांना स्प्रिंकलरच्या माध्यमातून पाणी देण्याची धडपड करावी लागत आहे
कधी काळ्या ढगांकडे पाहून पाऊस बरसण्याची आस तर कधी कोरड्या पडलेल्या जमिनीकडे पाहून चिंता अशी अवस्था सध्या येवल्यातील शेतकऱ्यांची झाली आहे
गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतातील पिकांची वाढ खुंटण्याची भीती निर्माण झाली आहे पिकांना पाण्याची गरज असतानाच पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा आधार घेत स्प्रिंकलर सुरू केले आहेत
शेतात स्प्रिंकलरच्या माध्यमातून पाण्याची फवारणी करून पिकांना जगवण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र, हा आधार किती दिवस पुरणार, हा प्रश्नही शेतकऱ्यांसमोर आहे
कारण उपलब्ध पाणीसाठा मर्यादित आहे पाऊस झाला नाही तर पुढील काळात पिकांना पाणी देणं अधिक कठीण होणार आहे त्यामुळे हातातोंडाशी आलेलं पीक वाचवायचं कसं, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे
पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाची नजर आता पुन्हा एकदा आभाळाकडे लागली आहे पुढील चार-पाच दिवसांत दमदार पाऊस झाला, तर पिकांना मोठा दिलासा मिळू शकतो मात्र पावसाने आणखी ओढ दिली, तर पिकांची परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे